सातारा – विद्यापीठ शिक्षक कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काम करणाऱ्या कास्ट्राईब विद्यापीठ शिक्षक संघटना शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी मिलिंद कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. कास्ट्राईब विद्यापीठ शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. कृष्णा इंगळे यांनी मिलिंद कांबळे यांना निवडीचा आदेश दिला आहे.

मिलिंद कांबळे हे यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालय, जकातवाडी, सातारा येथे कार्यालय अधिक्षक पदावर कार्यरत आहेत. गेली 13 वर्षे मिलिंद कांबळे हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांचा सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांशी चांगला संपर्क असून शिक्षकांच्या न्याय प्रश्नावर ते चांगल्या प्रकारे काम करतील अशी प्रतिक्रीया कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव नामदेवराव कांबळे यांनी व्यक्त केली आहे. विद्यापीठ कार्यकारणी निवडीचे अधिकार मिलिंद कांबळे यांना देण्यात आले असून लवकरच कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल.

विद्यापीठ शिक्षक संघटना राज्य सरचिटणीस मा. सत्यदेव रामटेके, प्रा. सुरेश वाघमारे, (स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड), प्रा. अरुण गायकवाड अध्यक्ष (सा. फु. पुणे विद्यापीठ, पुणे), प्रा. डॉ. राजेंद्र कांबळे, (रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर), प्रा. अनमोल शेंडे अध्यक्ष, (गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली) तसेच संघटनेचे महासचिव नामदेवराव कांबळे, राज्य उपाध्यक्ष, सुशीलकुमार कांबळे, कास्ट्राईब जि. प. कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अशोक भोसले, कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष, अजित वाघमारे, कास्ट्राईब जि. प. सातारा अध्यक्ष मिलिंद कांबळे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे प्रशांत मोरे, समाज कल्याण विभागाचे मिलिंद घमरे, पुणे विभागीय संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत झाल्टे, विभागीय सचीव प्रविणकुमार चांदणे, भूमि अभिलेख कास्ट्राईब संघटनेचे मनोज मस्के, वरीष्ठ पदाधिकारी दिलीप कांबळे, ऋषिकेश शिलवंत यांनी मिलिंद कांबळे यांचे अध्यक्षपदी निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)