कासुर्डीमध्ये रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू

यवत – सोलापूर -पुणे लोहमार्गावर दौंड तालुक्‍यातील कासुर्डी गावच्या हद्दीत रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.11) सकाळी 6.30 च्या सुमारास घडली आहे. सूजाता बापू यादव (वय 45, रा. खामगाव, यादववाडी, ता. दौंड, जि. पुणे) असे रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेचा मृतदेह सोलापूर-पुणे रेल्वेलाईन कि.मी. क्रमांक 229/8/9च्या जवळ आढळून आला. या घटनेची खबर संजय नारायण नागवडे (वय 43, रा. खामगाव, यादववाडी, ता. दौंड) यांनी यवत पोलिसांना दिली. यवत पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. या महिलेचा अपघात की घातपात आहे ? याविषयीचा अधिक तपास पोलीस हवालदार नंदकुमार लोणकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)