कासारी फाट्यावर टॅंकरमधून डीझेलची चोरी

पुणे-नगर रस्त्यावरील पेट्रोल पंपातील घटना : अज्ञातांवर गुन्हा

शिक्रापूर- कासारी फाटा (ता. शिरूर) येथे पुणे-नगर रस्त्याच्या लगत असलेल्या एका पेट्रोल पंपामध्ये रात्रीच्या सुमारास थांबलेल्या डिझेल टॅंकरचे कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे अडीचशे लिटर डीझेलची चोरी केली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञांतावर गुन्हा दाखल केला आहे.
टॅंकरचालक लक्ष्मण प्रभाकर वटूले (रा. भारजवाडी पोस्ट मिडसांगी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, वर्धा येथील एका पेट्रोलपंप येथून डीझेल घेऊन वटूले डीझेल टॅंकर (एमएच 32 क्‍यू 5864) घेऊन निघाले होते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कासारी फाटा येथे आल्यानंतर चालकाने टॅंकर कासारीफाटा येथे असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोलपंप येथे लावला आणि टॅंकरमध्ये झोपला. आज (शनिवारी) सकाळी चालक उठला असताना त्याच्या टॅंकरच्या तोटीचे कडी कोयंडे तुटलेले आणि डीझेल जमिनीवर सांडलेले आढळून आले, त्यावेळी त्याने पाहणी केली असताना त्याला टॅंकरमधील सुमारे अडीचशे लिटर डीझेल चोरीला गेले असल्याचे आढळून आल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब थिकोळे करीत आहेत.

  • डीझेल चोरीची टोळीच कार्यरत?
    पुणे-नगर रस्त्यावर या पूर्वी शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, कोंढापुरी या ठिकाणी अनेकदा वाहनांमधून डीझेल चोरीच्या घटना घडल्या आहेत, कित्येकदा चोरीचे प्रकार सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाले आहेत, तर काही वर्षांपूर्वी शिक्रापूर पोलिसांनी डीझेलचोरी करणारे वाहन व आरोपी ताब्यात घेतले होते तर सध्या घडत असलेल्या या प्रकारामुळे या परिसरात डीझेल चोरीची टोळीच कार्यरत असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)