कासारशिरंबे शाळेत संविधान दिन साजरा

कासारशिरंबे : गोवर रुबेला एम. आर. माहिती कार्डाचे विद्यार्थ्यांना वाटप करताना शिक्षक.

वाठार, दि. 26 (वार्ताहर) – कासारशिरंबे, ता. कराड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन व गोवर रुबेला प्रबोधन कार्यक्रम विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील होते. यावेळी मुख्याध्यापक प्रकाश कोळेकर, गोरखनाथ कुंभार, नारायण सातपुते, उपशिक्षिका सौ. जयश्री साळुंखे, सौ. मंदाकिनी वाघमारे, सौ. हेमलता पाटील, उपशिक्षक मयाप्पा कांबळे, सचिन रसाळ तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विजय गवळी यांनी तंबाखूमुक्त शाळा यासंदर्भात माहिती दिली. प्रकाश कोळेकर यांनी गोवर रुबेला लस फायदे-तोटे याविषयी माहिती दिली. तसेच गोवर रुबेला एम. आर. माहिती कार्ड विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. मुकुंद पन्हाळे यांनी आभार मानले. प्रारंभी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली.
गोवर रुबेला लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी प्रभातफेरीतून जनजागृतीसंदर्भात घोषणा देण्यात आल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)