कासारवाडीत “बर्निंग बस’चा थरार

पिंपरी – शिवाजीनगर ते श्रीरामपूर ही शिवशाही बस कासारवाडी येथे मुक्कामाला होती. रविवारी (दि. 6) सकाळी सातच्या सुमारास बस श्रीरामपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असताना बसला तांत्रिक बिघाडामुळे आग लागली. पुणे-मुंबई जुना महामार्गावर कासारवाडी मधील कुंदननगर येथे ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शिवशाही बस (एमएच 14, जीयु 2310) शिवाजीनगर ते श्रीरामपूरला जाणार होती. रात्री ही बस मुक्कामासाठी कासारवाडी येथे होती. या बसवर पप्पू अजित आव्हाड हे चालक म्हणून काम करतात. सकाळी शिवाजीनगरहून श्रीरामपूरला जाण्यासाठी बस कासारवाडीहून शिवाजीनगरच्या दिशेने घेऊन जात असताना बस कुंदननगर येथे आली असता तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बसने अचानक पेट घेतला. भर रस्त्यावर बस पेटलेली दिसल्याने स्थानिक नागरिक गणेश तापकीर यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाला माहिती मिळताच तात्काळ मुख्य अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. बसमध्ये फक्त चालक म्हणून आव्हाड होते. आग लागल्याचे समजताच आव्हाड बसमधून बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही बस भाडेतत्त्वावर हायर कंपनीकडून घेतली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, बसला लागलेली आग अग्निशमन विभागाचे अशोक कानडे, अजय कोकणे, राजू काटकर, अक्षय पाटील, शांताराम घारे, शिवाजी चेडे यांच्या पथकाने विझवली.

वल्लभनगर आगारात बसचा अपघात
वल्लभनगर येथील आगारात शनिवारी (दि. 5) सायंकाळी सातच्या सुमारास आणखी एक अपघात झाला. पिंपरी-चिंचवड ते चिपळूण ही बस वल्लभनगर येथे फलाटावर उभी होती. या बसचा चालक बसची नोंद करण्यासाठी वाहतूक केंद्राकडे गेले असता होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले ब्रीक्‍स कंपनीचे सुपरवायजर पोतदार हे कोणाच्याही परवानगी शिवाय चालकाच्या सीटवर बसले व त्यांनी बस सुरु केली. यामध्ये बस मागे सरकली व पाठीमागे असलेल्या मालवण आगाराच्या शिवशाही बसला धडकली. अपघातानंतर पोतदार याने तेथून धुम ठोकली. यामध्ये शिवशाही बसच्या उजव्या बाजूचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)