• कुणाल लांडगे यांचा पुढाकार : तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील पवना नदीला जलपर्णीचा विळखा पडल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महापालिका प्रशासनाला या संदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र, जलपर्णी काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याने कुणाल लांडगे युवा मंचातर्फे जलपर्णी मुक्‍त पवनामाई अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानास परिसरातील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या अभियानामध्ये ह-प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, ह-प्रभाग स्वीकृत सदस्य कुणाल लांडगे, सुनील लांडगे, विकास आबा लांडे, अप्पा धझावडे, संतोष टोनगे, गजानन मोरे, मयुर रानवडे, आकाश लांडगे, विशाल लांडगे, डॉ.भालशंकर, गणेश जवलकर, अमित लांडे, भाजपा पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, युवक, महापालिका अधिकारी यांनी या अभियानामध्ये सहभाग घेतला होता.

मागील स्थायी समितीमध्ये नदीमधील जलपर्णी न काढल्याने शहराला डासांचा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे जलपर्णी काढण्यासाठी महापालिका प्रवाशांनी काम सुरु करावे, अशा सूचना स्थायी सभापती आणि सदस्यांनी दिल्या होत्या. मात्र, अद्यापपर्यंत या नदीमधील जलपर्णीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या शिवाय जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेने निविदा राबविणार नसल्याचे सांगितले आहे.

महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी जलपर्णी काढतील असे आयुक्तांनी सांगितले होते. मात्र, परिसरातील नागरिकांना या जलपर्णीमुळे डासांचा त्रास सहन करावा लागत होता. तसेच विविध आजारांचा सामना करावा लागतो आहे. परिसरातील नागरिकांची डासांपासून मुक्तता कऱण्यासाठी कुणाल लांडगे युवा मंचच्या वतीने जलपर्णी काढण्यासाठी अभियान राबविण्यात आले आहे.

जलपर्णीमुक्‍त पवनामाई अभियानाअंतर्गत दर रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी ही जलपर्णी काढण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे जास्तीत-जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे आणी जलपर्णी मुक्त पवनामाई करण्यासाठी सहकार्य करावे.
– कुणाल लांडगे, स्वीकृत सदस्य, महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)