कासारवाडीतील शाळा इमारतीसाठी सल्लागार

पिंपरी – महापालिकेच्या प्रत्येक कामासाठी सल्लागार नेमण्याचा पायंडा पडला आहे. आता कासारवाडी येथे नवीन शाळा इमारत उभारण्यात येणार असून त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापनाच्या नावाखाली सल्लागार नेमण्यात येणार आहे.

नवीन शाळा इमारत बांधणे हा प्रकल्प अत्यंत वैशिष्टयपूर्ण असून कासारवाडी परिसरातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि फायद्याचा असणार आहे. तांत्रिकदृष्ट्‌या या प्रकल्पाचे स्वरूप वैशिष्ट्‌यपूर्ण आहे. त्यामुळे आराखड्यानुसार काम करून घेणे, त्यांचे मोजमाप घेवून देयक तयार करणे, प्रकल्पाच्या दैनंदिन कामावर देखरेख करणे, निविदा निर्देशानुसार गुणवत्ता तपासणी करणे, विविध कामांसाठी विविध खात्यांची समन्वय बैठक घेणे आदी निविदा पश्‍चात कामे करणे, हे चोखपणे होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी महापालिकेला सल्लागाराची गरज भासली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून मेसर्स हर्षल कवडीकर, पुणे यांची शिफारस महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली आहे. हर्षल कवडीकर यांची नेमणूक वास्तूविशारद म्हणूनही करण्यात आली असून त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला वेळोवेळी, आवश्‍यक मागणीनुसार सेवा दिलेली आहे. कासारवाडीतील नवीन शाळा इमारतीचे काम वास्तुविशारदाच्या दृष्टीने होणे आणि संकल्प चित्राप्रमाणे त्याची नियोजित वेळेत अंमलबजावणी होण्यासाठी त्यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार असल्याचा दावा आयुक्‍तांनी केला आहे. स्थायी समितीनेही आयुक्तांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या सल्ल्यासाठी महापालिका नेमके किती रुपये मोजणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

चिखलीतील विद्यालयासाठी वास्तू विशारद
महापालिका सुमारे सत्तावीस कोटी रुपये खर्चून चिखलीमध्ये विद्यालय उभारणार आहे. गट नंबर 606 येथे विद्यालयासाठी आरक्षण आहे. या कामांतर्गत माध्यमिक शाळा इमारतीबरोबरच सांस्कृतिक केंद्रही उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करणे, महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणे आदी कामे ही करण्यात येणार आहेत. त्यासाठी स्थापत्य विषयक कामांचे पूर्वगणकपत्र तयार करणे, निविदा बनविण्यासह कामाची देखरेख करणे आदी कामांसाठी स्थापत्य विभागाने महापालिका पॅनलवरील वास्तूविशारदांकडून दर मागविण्यात आले. त्यामध्ये लघुत्तम दर सादर केलेल्या ज्योती पानसे असोशिएटस्‌ यांची वास्तूविशारद म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रकल्प खर्चाच्या दोन टक्के शुल्क या कंपनीला अदा करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)