कासारआंबोलीत पर्यावरणपूरक सजावट

पिरंगुट – कासारआंबोली (ता. मुळशी) येथील श्रीमंत कासार पाटील मित्र मंडळाने नारळाच्या झावळ्यांपासून केलेल्या पर्यावरणपूरक सजावटीत गणेशाची स्थापना केली आहे. योगेश मरळ आणि सागर डोंगरे यांची संकल्पना असलेले “सैनिक’ हे नाट्य सादर केले असून, त्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. उत्सव साधेपणाने साजरा करून शिल्लक रकमेतून केरळ पुरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. माजी सरपंच राजेंद्र मारणे, जिल्हा परिषद सदस्या अंजली कांबळे, माजी सरपंच सुवर्णा मारणे, प्रकाश मरळ, यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ कार्यरत आहे. यावर्षी मंडळाचे अध्यक्ष हिरामण भिलारे,उपाध्यक्ष संदीप कांबळे, कार्याध्यक्ष परशुराम शिंदे, आदींनी उत्सवाचे नियोजन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)