कासारअंबोलीतील गणेश मंदिरात दीपोत्सव

पिरंगुट- कासारआंबोलीत गणपती मंदिरात दीपोत्सव आणि शास्त्रीय भजनाचे आयोजन करण्यात आले होते. कासारआंबोली येथील श्रीमंत कासार पाटील मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने दादु कांबळे, बबन सोनवणे, छबन सोनवणे, नामदेव रायरीकर, गणपत सुतार यांनी आल्हादायक वातावरणात, बहारदार शास्त्रीय भजन सादर केले. दिवाळीत पहाटनिमित्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि भाविकांनी मंदिरात शेकडो पणत्या लावून दीपोत्सव साजरा केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या अंजली कांबळे, माजी सरपंच सुवर्णा मारणे, राजेंद्र मारणे, माउली कांबळे, विजय मारणे, माउली मळेकर, भानुदास मारणे, युवराज ओव्हाळ, कृष्णा मालपोटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष हिरामण भिलारे, उपाध्यक्ष संदिप कांबळे, कार्याध्यक्ष परशुराम शिंदे, प्रकाश मरळ, योगेश मरळ, प्रशांत मारणे, सागर कांबळे, बापुराव पाटील, अनिल पांगारे, प्रतिक मारणे, गजानन गंडे, अविनाश उबाळे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)