कोपरगाव – तालुक्यातील कासली येथील जय जनार्दन सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे रावसाहेब त्र्यंबक जाधव तर उपाध्यक्षपदी विलास बापू भगुरे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली.
रावसाहेब जाधव यांच्या नावाची सूचना बाबासाहेब मलिक यांनी केली. त्यास साहेबराव मलिक यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी विलास भगुरे यांच्या नावाची सूचना अर्जुन मलिक यांनी केली. त्यास विश्राम आहेर यांनी अनुमोदन दिले. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचा यावेळी संचालक मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. रावसाहेब जाधव म्हणाले, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जय जनार्दन सेवा सहकारी संस्थेच्या सभासद, शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी जिल्हा बॅंकेमार्फत असणाऱ्या योजनांची परिपूर्ती करू. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पूर्व भागाच्या विकासासाठी अनमोल योगदान दिले. त्यांच्या आभाराचा ठराव यावेळी मांडण्यात आला. सचिव शिवाजी मलिक यांनी सूत्रसंचालन केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे, त्र्यंबकराव सरोदे, नवनाथ आगवण, भास्कर भिंगारे आदींनी अभिनंदन केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा