कासगंज संघर्षाची घटना उत्तर प्रदेशासाठी काळीमा – राम नाईक

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची नाराजी


पोलिस अधिक्षकांना हटवले

लखनौ – उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यातील जातीय दंगलीचा प्रकार म्हणजे राज्यातील प्रशासनासाठी काळीमा असल्याची प्रतिक्रिया राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्‍त केली आहे. अशा प्रकारच्या घटना उत्तर प्रदेशात पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

कासगंजमधील हिंसाचाराच्या पार्श्‍वभुमीवर उत्तर प्रदेश सरकारने कासगंजचे पोलिस अधिक्षक सुनिल कुमार सिंह यांना पदावरून हटवले आहे. त्यांच्या जागेवर पियुष श्रीवास्तव यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. सुनिल कुमार सिंह यांना मीरत येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रावर नियुक्‍त करण्यात आले.

-Ads-

या हिंसाचारामध्ये मरण पावलेल्या चंदन गुप्ता यांच्या नातेवाईकांना प्रशासनाच्यावतीने 20 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. या दंगलीदरम्यान किमान 3 दुकाने, 2 बस आणि कार जाळण्यात आली होती. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीवर झालेल्या दगडफेकीतून ही दंगल उसळली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)