काष्ठशिल्पातून साकारला नवनवीन कलाआविष्कार

बुध गावचे राजुल बोराटे यांच्यावर गावातून कौतुकाचा वर्षाव 

बुध – कोणत्याही कलाकारास त्याचा अंगभूत कलाविष्कार दाखवण्यासाठी कोणते ना कोणते माध्यम निवडावे लागते. काष्ठशिल्प, चित्रकला, संगीत, लेखन, छायाचित्रण अशा वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून सुंदर कलाकृती बनवून त्यातच रोजगार शोधणारे बुध गावचे राजुल बोराटे गावात कौतुकाचा विषय झाले असून त्यांनी बनवलेली काष्ठशिल्प अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबईत कला शाखेची पदवी घेतल्यानतर छायाचित्रणातून उदरनिर्वाह चालवणारे राजूल काष्ठशिल्प तसेच चित्रकलेतून आपला छंद जोपासत आहेत. काष्ठ, म्हणजे लाकूड’. लाकूड हे मातीहून कठीण तर पाषाणाहून मऊ तसेच हलके असते. यावर काम करताना लाकडाचा मूळ पोत व नैसर्गिक घडणीचा विचार करून त्यास आकार द्यावा लागतो.

यावेळी अत्यंत विचारपूर्वक व दक्षतेने काम करावे लागते. अन्यथा पूर्णत्वास आलेली कलाकृती एखादा ठपला निघाल्यास निकामी होण्याची शक्‍यता असते. राजूल बोराटे यांनी साकारलेली काष्ठशिल्प सर्वांची लक्ष वेधून घेत आहेत. यापूर्वी अनेक स्पर्धामधून धवल यश मिळवून पारितोषिक कला समीक्षक तसेच प्रसिध्द चित्रकार यांच्या प्रशंसेसही ते पात्र ठरले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)