काष्टीत आठवर्षीय मुलाचा खून

श्रीगोंदे – काष्टी शिवारात शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास उसाच्या शेतात एका आठवर्षीय मुलाचा मृतदेह आढळला. या मुलाचा गळा आवळून खून केल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. या मुलाची ओळख पटवून आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान श्रीगोंदे पोलिसांपुढे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, काष्टी- श्रीगोंदे रस्त्यावर एका उसाच्या शेतात आठवर्षीय मुलाचा मृतदेह आढळला. या मुलाच्या अंगात टी शर्ट आणि पॅन्ट आढळून आली. या मुलाच्या शरीरावर इतर कुठेही जखमा नसल्या तरी गळ्याभोवती काळे व्रण आढळून आले आहेत. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी त्या मुलाची चप्पल आढळून आली आहे. या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होणार असले तरी या मुलाचा गळा आवळून खून करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, श्‍वानपथकाने घटनास्थळापासून 100 मीटर अंतरापर्यंत माग दाखविला. याचाच अर्थ हा मृतदेह वाहनातून घेऊन येऊन या ठिकाणी टाकला असावा. दरम्यान, हा मुलगा कोण आहे? त्याचा खून कुणी केला याबाबत पोलिसांना सखोल तपास करावा लागणार आहे. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार म्हणाले, की या मृतदेहाची अद्यापि ओळख पटलेली नाही. दौंड आणि इतर आजुबाजुच्या पोलीस ठाण्यात याबाबत माहिती कळविली आहे. दौंड रेल्वे पोलीस ठाण्यात एक सातवर्षीय मुलगा मिसिंग असल्याची फिर्याद दाखल आहे. त्या मुलाच्या नातेवाईकांकडे अधिक चौकशी सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)