काश्‍मीरात लष्कर ए तोयबाचे सहा दहशतवादी ठार

file photo

श्रीनगर: जम्मू काश्‍मीरातील अनंतनाग जिल्ह्यात लष्करा बरोबर झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाचे सहा दहशतवादी ठार झाले. दहशतवादाच्या विरोधातील कारवाईत लष्कराला मिळालेले हे एक मोठे यश मानले जात आहे. ही चकमक अनंतनाग जिल्ह्याच्या बिजबेहरा जवळच्या वघनमा भागात झाली. त्या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने तेथे काल रात्रीपासून मोठी नाकाबंदी केली होती.

आपण घेरलो गेलो आहोत असे लक्षात येताच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करून तेथून निसटून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत हे सहा जण ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून ते लष्कर ए तोयबा या संघटनेसाठी काम करीत होते अशी माहिती मिळाली आहे. त्यांच्या कडे मोठा दारूगोळा आणि शस्त्रसाठा सापडला असून तो ताब्यात घेण्यात आला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)