काश्‍मीरात तुफानी बर्फवृष्टी

file photo

उर्वरीत भारताशी असलेला संबंध तुटला

श्रीनगर: काश्‍मीरात तुफानी बर्फवृष्टी झाल्याने काश्‍मीरचा उर्वरीत भारताशी असलेला संपर्क तुटला असून रस्तावाहतूक पुर्ण ठप्प झाली आहे. काश्‍मीर खोऱ्यात काल मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत जोरदार ते मध्यम स्वरूपाची बर्फवृष्टी अनेक ठिकाणी झाली. काही ठिकाणी शुक्रवारी दुपारपासूनच बर्फवृष्टी सुरू होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्रीनगर-लेह महामार्ग, मुघल रोड असे महत्वाचे रस्ते वाहतुकीला बंद करण्यात आले आहेत. श्रीनगर हवाईतळावरील विमान वाहतूकही विस्कळीत झाली असून अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत तर या विमानतळावर उतरणारी विमाने अन्यत्र वळवावी लागली आहेत. बर्फवृष्टीने श्रीनगर शहर आणि जिल्ह्यातील सामान्य जनजीवन पुर्ण ठप्प झाले आहे. बर्फवृष्टीमुळे काश्‍मीर खोऱ्याती तापमानात मोठी घट झाली असून काल रात्री श्रीनगर शहरातील तापमान उणे 3.2 अंश सेल्सीयस इतके नोंदवले गेले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)