काश्‍मीरात इसिसचे अस्तित्व नाही

सरकारचा संसदेत खुलासा
नवी दिल्ली – इस्लामिक स्टेटच्या गनिमांचे जम्मू काश्‍मीरात अस्तित्व नाही केवळ त्यांचे झेंडे तेथे फडकवण्याचे किरकोळ प्रकार तिथे घडले आहेत अशी माहिती सरकारतर्फे संसदेत देण्यात आली. या संबंधात बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी म्हटले आहे की इसिस किंवा पाकिस्तानचे झेंडे फडकवणाऱ्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात आली आहे.

सन 2017 या वर्षात असे ध्वज फडकवण्याच्या एकूण पाच घटना घडल्या होत्या. त्या आधीच्या वर्षात म्हणजे सन 2016 मध्ये अशा प्रकारच्या 31 घटना घडल्या होत्या. अहिर म्हणाले की तेथील इसिसचे अस्तित्व नाममात्र आणि केवळ झेंडा फडकावण्यापुरतेच मर्यादित आहे. 22 जून 2018 रोजी इस्लामिक स्टेटच्या प्रभावाखालील चार अतिरेक्‍यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्या विचारसरणीचा एकही दहशतवादी तेथे कार्यरत नाही असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात राज्यपाल राजवट लागू केल्यानंतर आत्तापर्यंत तेथे 176 जणांना दगडफेक केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे अशी माहितीही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली. गेल्या वर्षभरात सुरक्षा दलांबरोबरच्या कारवाईत एकूण 213 दहशतवादी काश्‍मीरात ठार झाल्याची माहितीही त्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)