काश्‍मीरातील पंचायत निवडणुकांबाबत केंद्र व राज्य सरकारच गोंधळात

कॉंग्रेसचा आरोप
श्रीनगर – जम्मू काश्‍मीरातील पंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे असा आरोप प्रदेश कॉंग्रेस समितीने केला आहे. या स्थितीबाबत पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांना माहिती देण्यासाठी पक्षाची एक समिती दिल्लीला पाठवली जाईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जी. ए. मीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या निवडणुकांबाबत राज्यातील सरकारने वारंवार आपली भूमिका बदलली आहे त्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे. केंद्र सरकारचे या बाबतचे धोरणही धरसोडीचेच आहे असे वारंवार स्पष्ट झाले. पुर्वनियोजीत कार्यक्रमानुसार पुढील महिन्यात या निवडणुका होणार आहेत.

तथापी त्या निवडणुकीत सहभागी व्हायचे की नाहीं याचा निर्णय आम्ही केंद्रीय नेत्यांशी चर्चा करून घेऊ असे ते म्हणाले. या निवडणुकांच्या बाबत राज्यपाल मलिक हेच द्विधा मनस्थितीत आहेत. राज्यातील सध्याची स्थिती लक्षात घेता या निवडणुका पार पडतील की नाही याबाबत त्यांनीच जर शंका व्यक्त केली आहे तर सरकार या निवडणुका घेण्यास उत्सुक आहे की नाही याविषयीच शंका निर्माण होते आहे असे त्यांनी नमूद केले आहे. या निवडणुका ठरल्याप्रमाणे होणार आहेत की नाही हे आधी सरकारने स्पष्ट करावे अशी मागणीही त्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)