काश्‍मीरातील चकमकीत हिज्बुलचे दोन दहशतवादी ठार

File photo

श्रीनगर – काश्‍मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले. या जिल्ह्यातील मुनीवारद गावात काही अतिरेकी आले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाल्यानंतर त्यांनी त्या गावाला वेढा देऊन शोधमोहीम हाती घेतली त्यावेळी सकाळी एका ठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार करून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी प्रत्युत्तरादाखल सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. त्यांची ओळख पटली नाही. पण ते हिज्बुलचे दहशतवादी असल्याच्या वृत्ताला मात्र पुष्टी मिळाली आहे.

गेले काही दिवस सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांच्या हालचालींवर कडक पाळत ठेवली असून त्यांना त्यांच्या विषयीची माहिती देण्यासाठी ग्रामस्थांकडूनही काही प्रमाणात सहकार्य मिळत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)