काश्‍मीरमध्ये हिज्बुलचे दोन दहशतवादी ठार 

श्रीनगर: जम्मू काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये हिज्बुल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी आज ठार झाले. पुलवामाच्या तिक्केन भागामध्ये दहशतवादी लपून बसले असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून सुरक्षादलांनी शोधमोहिम सुरु केली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करायला सुरुवात केली आणि चकमकीला सुरुवात झाली.

दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तर दिले असताना त्यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले, असे सुरक्षा दलांच्या प्रवक्‍त्याने सांगितले. ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे लियाकत मुनीर वाणी आणि वाजिद उल इस्लाम अशी आहेत. यातील वाणी हा बिलो दारगुंड भागातील तर वाजिद हा बभार रहिवासी होता. हे दोघेही हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. सुरक्षा दलांवरील हल्ले आणि अन्य घातपाती कारवायांमध्ये ते दोघेही सहभागी होते. या दोघांकडून एके आणि इन्सास रायफली आणि अन्य घातपाती साहित्य आढळून आले आहे. इन्सास रायफल ही एका जवानाकडून हिसकावून घेतलेली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)