काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर – काश्‍मीरमध्ये आज झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत अडथळे आणण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या गटाने सुरक्षा जवानांवर दगडफेक केल्याने दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष झाला. त्यामध्ये एक युवक मृत्युमुखी पडला.

पुलवामा जिल्ह्यातील थुम्ना गावात काही दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेवेळी दहशतवाद्यांनी आश्रय घेतलेल्या घराला सुरक्षा जवानांनी वेढले. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली. त्या चकमकीत तिन्ही दहशतवादी मारले गेले. चकमकीवेळी संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणात स्थानिक जमा झाले. त्यातील एका गटाने दहशतवाद्यांना पलायन करता यावे यासाठी सुरक्षा जवानांवर दगडफेक सुरू केली. दगडफेक करणाऱ्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा जवानांनी बळाचा वापर केला. त्यात पाच नागरिक जखमी झाले. जखमींपैकी एकाचे रूग्णालयात नेले जात असताना निधन झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, शोपियॉं जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्ती पथकाला लक्ष्य करून ग्रेनेड हल्ला घडवला. त्या ग्रेनेडच्या स्फोटात तीन लष्करी जवान जखमी झाले. सुदैवाने त्यांच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचे समजते. दरम्यान, ग्रेनेड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी तातडीने मोहीम हाती घेण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)