काश्‍मीरमध्ये लष्कराकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर – भारतीय जवानांनी दक्षिण काश्‍मीरमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. अनंतनाग येथील वानी हमा गावात सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये चकमक ही झाली.

तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित होते. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून एक एके-47, एक एसएलआर आणि एक पिस्टल जप्त करण्यात आली आहे. शनिवारी दक्षिण काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी मारले गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)