काश्‍मीरमध्ये महामार्गाजवळ आयईडी सापडली

जैशचा दहशतवादी अटकेत

श्रीनगर – दक्षिण काश्‍मीरमध्ये महामार्गाजवळ 25 किलो “आयईडी’ पुरुन ठेवल्याचे उघड झाले. महामार्ग उडवून देण्यासाठी दहशतवाद्यांनी ही स्फोटके महामार्गाजवळ पेरून ठेवली असल्याचा संशय आहे. या प्रकरणी जैश ए मोहंम्मद संघटनेच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. मुझ्झमिल अहमद दर असे या 22 वर्षीय दहशतवाद्याचे नाव असून तो मूळचा दक्षिण काश्‍मीरमधील त्राल भागातील रहिवासी आहे. तो जैश ए मोहंम्मदच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात असायचा आणि घातपाती कारवायांचे कट करण्यात सक्रिय होता, असे पोलिसांनी सांगितले.

दक्षिन काश्‍मीरमधील बिजबेहरा जिल्ह्यातील संगम भागात राष्ट्रीय महामार्गापासून काहीशे मीटर अंतरावरच ही स्फोटके पेरून ठेवण्यात आल्याचे आढळून आले, असे पोलिसांनी सांगितले. दरवर्षीची अमरनाथ यात्रा याच मार्गावरून जात असते. याशिवाय लष्कर आणि निमलष्करी दलाच्या वाहनांचे ताफेही याच मार्गावरून नियमितपणे जात असतात.

पेरून ठेवलेल्या “आयईडी’बरोबर मोबाईल फोन स्फ़ोटासाठी आवश्‍यक 12 व्होल्टची बॅटरी, सेफ्टी फ्युज वायर, कॉर्डोक्‍स वायर, ब्लॅक ऍन्ड व्हाईट एक्‍सप्लोजिव्ह आणि सर्किट वायर आदी उपकरणेही जमिनीमध्ये पुरून ठेवल्याचे उघड झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)