काश्‍मीरमध्ये बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित कोठडीतून पळाला

भादारवाह (जम्मू काश्‍मीर) – जम्मू काश्‍मीरमधील दोडा जिल्ह्यातल्या एका शाळेच्या आवारात कमी क्षमतेच्या बॉम्बचा स्फोट घडवण्यात सहभाग असलेला संशयित आरोपी पोलिस कोठडीतून पलायन करण्यात यशस्वी झाला. दोडा जिल्ह्यात शिवा गावात सोमवारी झालेल्या या स्फोटामध्ये शाळेचे मुख्याध्यापक होशियार सिंह आणि अन्य एक कर्मचारी जखमी झाले होते.

या स्फोटासाठी क्रूड स्फोटकांचा वापर करण्यात आला असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले होते. जम्मू काश्‍मीर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने डझनवारी लोकांची चौकशी करून या संशयिताबरोबर अन्य दोघाजणांना संशयावरून ताब्यात घेतले होते. तन्वीर अहमद, शाळेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि मीर दिन या तिघांना कालच संध्याकाळी ताब्यात घेतले होते.

-Ads-

या तिघांना भल्ला येथील पोलिस ठाण्याततील लॉक अपमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र नैसर्गिक विधीचे निमित्त करून अहमद हा पळून जाण्यात यशस्वी झाला. स्वच्छतागृह पोलिस ठाण्याच्या बाहेर असल्याने अंधाराचा फायदा घेऊन तो पळून गेला. त्याच्या शोधासाठी पोलिस रवाना झाले आहेत. तर कर्तव्यात चुकारपणा केल्याबद्दल कामावरील पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)