काश्‍मीरमध्ये नव्या मार्गाने घूसखोरीच्या तयारीत दहशतवादी

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) – काश्‍मीरमध्ये नव्या मार्गाने घूसखोरीच्या तयारीत दहशतवादी असल्याची महिती गुप्तचर संस्थांनी दिली आहे. एकीकडे शांतिवार्तेसाठी चर्चेचा प्रस्ताव मांडत दुसरीकडे भारतात दहशतवादी घुसवण्याच्या प्रयत्नात काश्‍मीर असल्याचे चित्र दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्‍मीरमधील नवीन मार्गांनी भारतात दहशतवादी घुसवण्याच्या प्रयत्नात आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कर आहे. त्यासाठी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये तीन लॉंच पॅड्‌स (लोसर कॉंप्लेक्‍स, सोनार आणि सरदारी) सज्ज आहेत. घूसखोरीसाठीच्या मार्गात नौशेरा नार, गोविंद नाला आणि परिबल फॉरेस्ट यांसारखे दहशतवादी मार्ग आहेत. या मार्गांनी दहशतवादी बंदीपोरामध्ये घूसखोरी करण्यास सज्ज आहेत.

-Ads-

पाकव्याप्त काश्‍मीरात लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद आणि हिजबूल मुजाहिदीनचे 61 दहशतवादी तयार असल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी सरकारला दिलेली आहे. हे दहशतवादी केरन सेक्‍टरसमोरील दूधनियाल आणि अठमुगम लॉंच पॅडवर सज्ज आहेत.

हिमवर्षावर सुरू होण्यापूर्वीच या दहशतवाद्यांना काश्‍मीर खोऱ्यात घुसवण्याची पाकिस्तानची धडपड आहे.
हे दहशतवादी आणि त्यांचे म्होरके यांच्या विरोधात सर्जिकल स्ट्राईक केल्यास घूसखोरीचे प्रयत्न हाणून पाडता येतील, आणि दहशतवाद्यांच्या उत्साहावर पाणी पडेल, असे भारतीय लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)