काश्‍मीरमध्ये दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खातमा

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठे यश मिळवताना सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खातमा केला. मारले गेलेले दहशतवादी पाकिस्तानी नागरिक होते. ते लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचे स्पष्ट झाले.

बांदीपोरा जिल्ह्यातील हाजीन भागात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी गुरूवारी विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेवेळी सुरक्षा जवान आणि दहशतवादी आमनेसामने आल्याने त्यांच्यात चकमक झडली. त्यामध्ये दोन पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले.

बुधवारी अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झडली. त्यातही दोन दहशतवादी मारले गेले. ते हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचे सदस्य होते. जम्मू-काश्‍मीरमध्ये दोन दिवसांत चौघांचा खातमा करून सुरक्षा दलांनी दहशतवादी संघटनांना जोरदार हादरा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)