काश्‍मीरमध्ये दोन घटनांत 4 दहशतवाद्यांचा खात्मा

रियासीमध्ये 3 तर सोपोरमध्ये एकजण कारवाईदरम्यान ठार


12 सुरक्षा रक्षकही जखमी

जम्मू – पाकिस्तान धार्जिण्या जैश ए मोहंम्मद या दहशतवादी संघटनेच्या तिघा दहशतवाद्यांना जम्मू काश्‍मीरमधील रियासी जिल्ह्यात कंठस्त्नान घातले गेले. या कारवाईदरम्यान झालेल्या चकमकीमध्ये 12 सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.

यामध्ये तिघा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या पथकावर गोळीबार करून हे दहशतवादी काल पळून गेले होते. त्यानंतर त्यांचा कसून शोध घेतला गेला होता.
हे तिघेही दहशतवादी मूळचे पाकिस्तानी होते आणि तरनाह नालामधून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून काश्‍मीरमध्ये आले होते. कथुआ जिल्ह्यातील दयालचाक भागातून ट्रकमधून ते रियासीपर्यंत आले होते, असे पोलिसांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या दहशतवाद्यांच्या शोधासठी सीआरपीएफ, पोलिस आणि लष्कराने काक्रियाल भागात नाकाबंदी करून घरोघरी तपास केला. गुरुवारी दुपारी या दहशतवाद्यांना वेढण्यात आले होते. बुधवारी या दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी ड्रोन आणि हेलिकॉप्टरचाही वापर केला गेला होता. यावेळी 5 वाजेपर्यंत सुरु राहिलेल्या चकमकीमध्ये 12 सुरक्षा जवान जखमी झाले. चकमकीमध्ये तिघेही दहशतवादी मारले गेले. हे तिघेही जैश ए मोहंमदचे सदस्य होते.

सोपोरमध्ये जैशचा म्होरक्‍या ठार
सोपोरमध्ये जैश ए मोहंम्मदच्या आणखी दोघा दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यामध्ये “अली’नावाने ओळखला जाणारा एक सर्वात जूना म्होरक्‍याही ठार झाला आहे. सोपोरमधील चिंकीपोरा भागामध्ये सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईदरम्यान मोठी धुमश्‍चक्री झाली.

या चकमकीमध्ये अली उर्फ अतार आणि झहिउर रेहमान हे दोघे ठार झाले. जम्मू काश्‍मीरमधील अनेक घातपाती कारवायांमध्ये तो सक्रिय होता. उत्तर काश्‍मीरमध्ये स्फोट घडवून आणणे आणि सुरक्षा दलांवरील हल्ल्यामध्येही अलीचा सहभाग होता. “आयईडी’चे स्फोट घडवून आणण्यामध्ये तो तरबेज होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)