काश्‍मीरमध्ये तोयबाच्या दहशतवाद्याला अटक 

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमध्ये पोलिसांनी गुरूवारी एका दहशतवाद्याला अटक केली. झुबेर शाबीर बट असे त्याचे नाव आहे. तो पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. त्याला गंदेरबल जिल्ह्यात पकडण्यात आले. काही दिवसांपूर्वी मारला गेलेला तोयबाचा म्होरक्‍या आणि पाकिस्तानी नागरिक नाविद जट्ट याचा झुबेर जवळचा साथीदार होता. त्यामुळे त्याची अटक सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे.

सुरक्षा जवानांवरील हल्ले आणि त्यांची शस्त्रास्त्रे पळवून नेण्याच्या घटनांमध्ये सामील असणारा झुबेर बराच काळापासूून सुरक्षा यंत्रणांना हवा होता. त्याच्या अटकेमुळे तोयबाच्या अनेक नापाक कृत्यांवर प्रकाश पडण्याची शक्‍यता आहे. याशिवाय, तोयबाच्या कटांची माहिती मिळण्यासही मोठी मदत होणार आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)