काश्‍मीरमध्ये तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खातमा 

चकमकीत एक जवान जखमी 

श्रीनगर: जम्मू-काश्‍मीरमध्ये गुरूवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खातमा केला. ते पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या संघटनेचे सदस्य होते. दरम्यान, चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान जखमी झाला.

बडगाम जिल्ह्याच्या खानसाहीब भागात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेवेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर अचानकपणे गोळीबार केला. त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये मुख्तार अहमद खान आणि मोहम्मद अमिन मिर हे दहशतवादी मारले गेले. चकमकीत जखमी झालेल्या जवानाला उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. त्याच्या प्रकृतीला कुठला धोका नसल्याचे समजते.

दरम्यान, चकमकीचे चित्रिकरण करण्यासाठी निघालेल्या एका वाहिनीच्या व्हॅनवर स्थानिकांनी दगडफेक केली. त्यात व्हॅनचे नुकसान झाले. मात्र, कुणाला इजा पोहचल्याचे वृत्त नाही. बडगाममधील चकमकीत तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खातमा हे सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे. काश्‍मीरात मागील काही काळापासून सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये आतापर्यंत अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)