काश्‍मीरमध्ये तीन दिवसांत सात दहशतवादी ठार

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांनी मोठे यश मिळवताना तीन दिवसांत तब्बल सात दहशतवाद्यांचा खातमा केला. मंगळवारी बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. त्या जिल्ह्यातील सोपोर परिसरात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी त्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेवेळी जवान आणि दहशतवादी आमनेसामने आल्याने त्यांच्यात चकमक झडली. त्याआधी कुपवाडा जिल्ह्याच्या तंगधार भागात रविवार आणि सोमवार असे दोन दिवस लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झडली.

जवानांनी दोन दिवसांत पाच दहशतवाद्यांना ठार करून घुसखोरीचा डाव उधळून लावला. तीन दिवसांत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ठार झालेल्यांपैकी काही दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)