काश्‍मीरमधील हिंसाचार रोखण्यासाठी सहकार्य करू – ओमर अब्दुल्ला

जम्मू काश्‍मीरमधील पीडीपी भाजपा सरकारला ओमर अब्दुल्ला यांचे आश्‍वासन

जम्मू – ज्म्मू काश्‍मीरमधील हिंसाचार आणि रक्‍तपात कमी करण्यासाठी पीडीपी आणि भाजपा सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन नॅशनल कॉन्फरन्सचे कार्याध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी दिले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची ढासणारी स्थिती सुधारण्याच्या हेतूने चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

शोपियन जिल्ह्यामध्ये शनिवारी सुरक्षा रक्षकांकडून झालेल्या गोळीबारामध्ये दोन नागरिकांचा मृत्यूसंदर्भात विधानसभेमधील चर्चेदरम्यान त्यांनी हे आश्‍वासन दिले. “जम्मू काश्‍मीरमध्ये आतापर्यंत खूप रक्‍तपात झाला आहे. आपल्याला तो थांबवावा लागेल. त्या हेतूने कठोर संदेश दिला जावा म्हणूनच आपण सर्वजण जमलो आहोत. हा रक्‍तपात रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आवश्‍यक वाटणाऱ्या सर्व उपाय योजनांना नॅशनल कॉन्फरन्सचा पूर्ण पाठिंबा असेल.’ असे ते म्हणाले.

एकमेकांकडे बोट दाखवण्याच्या हेतूने चर्चा व्हायला नको. हिंसाचाचाराबाबत नॅशनल कॉन्फरन्सकडून कोणतेही राजकारण होत नाही. मात्र आघाडी सरकारमधूनच राजकारण होत आहे. हे राजकारण दूर ठेवायला हवे, असेही अब्दुल्ला म्हणाले. शोपियन जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांकडून झालेल्या गोळीबाराची न्यायालयीन चौकशीचे अदेश आणि एफआयआरसंदर्भातही त्यांनी शंका उपस्थित केल्या. या संदर्भातील गैरसमज पसरवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)