काश्‍मीरमधील युवकाने सोडला दहशतवादाचा मार्ग

श्रीनगर – दक्षिण काश्‍मीरमधील एक दहशतवादी हिंसाचाराचा मार्ग सोडून घरी परतला. कुटूंबीयांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन दहशतवादी मुख्य प्रवाहात सामील झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दहशतवादाचा मार्ग सोडणाऱ्या संबंधित युवकाचे नाव पोलिसांनी गुलदस्त्यात ठेवले.

त्या युवकाच्या सुरक्षेचा विचार करून त्याची ओळख उघड करण्यात आली नाही. मागील वर्षी पोलिसांनी स्थानिक दहशतवाद्यांच्या शरणागतीचे प्रस्ताव स्वीकारण्याची घोषणा केली. त्यानंतर काश्‍मीरमध्ये डझनभरापेक्षा अधिक दहशतवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडला.

हिंसाचाराचा मार्ग सोडण्याबाबत कुटूंबीयांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ते मुख्य प्रवाहात सामील झाले, अशी माहिती पोलीस सुत्रांकडून देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)