काश्‍मीरमधील दहशतवादी आमचे – मसूद अझरची कबुली

नवी दिल्ली – काश्‍मीरमध्ये कारवाया करणारे दहशतवादी आमचे असल्याची जाहीर कबुली जैश ए मोहम्मदच्या नेत्याने, मसूद अझरने दिली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान निवडून आल्यामुळे जैश ए मोहम्मदच्या अक्षर मसूदला मोठा आनंद झाला आहे. इम्रान खान यांच्या विजयानंतर अझर मसूदने एका ऑडियो जारी करून आपला आनंद जाहीर केला आहे आणि जिहादचे नारे लावले आहेत.

पाकिस्तानी लष्कराच्या छायेत वावरणाऱ्या अझर मसूदने लष्कराच्या आधाराने इम्रान खान सत्तेवर आल्यानंतर 11 मिनिटांची एक ऑडियो जारी केली आहे. या ऑडियोत अझर मसूदने अगदी खुलेपणाने काश्‍मीरमध्ये आपले दहशतवादी कारवाया करत असल्याची कबुली दिली आहे. आमचे दोन मुजाहिद शहीद झाल्याचे आणि त्यापैकी एकाने मृत्यूपूर्वी आपल्या रक्ताने भिंतीवर जैश ए मुहम्मद झिंदाबाद लिहिल्याचे सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नेहमीप्रमाणे भारताविरुद्ध जहर उगळताना अझर मसूदने सांगितले की जिहादसाठी इंटनेट आणि मोबाईलचा शस्त्रांसारखा वापर करावा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)