काश्‍मीरमधील चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद

श्रीनगर, -दक्षिण काश्‍मीरमध्ये आज दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद तर तिघे जखमी झाले. जखमींमध्ये एका कॅप्टनचाही समावेश आहे. शोपियॉं जिल्ह्यातील एका गावात काही दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली. त्यानंतर लष्करी जवानांनी संबंधित गावात दहशतवाद्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेतली.

या मोहिमेवेळी जवानांना पाहिल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यात जखमी झालेल्या पाच जवानांना उपचारासाठी तातडीने लष्करी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना दोघांचे निधन झाले. दरम्यान, चकमकीनंतर दहशतवाद्यांनी अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले. त्यांच्या शोधासाठी लष्करी जवानांनी हाती घेतलेली मोहीम उशीरापर्यंत सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)