काश्‍मीरमधील चकमकीत पाकिस्तानी दहशतवादी ठार

संग्रहित छायाचित्र.

श्रीनगर – दक्षिण काश्‍मीरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार केले. तो जैश-ए-महंमद या पाकिस्तानस्थित संघटनेचा सदस्य असल्याचे स्पष्ट झाले. अनंतनाग जिल्ह्यातील वैलू भागात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी विशेष मोहीम हाती घेतली.

या मोहिमेवेळी सुरक्षा जवान आणि दहशतवादी आमनेसामने आल्याने चकमक झडली. चकमकस्थळी दहशतवाद्यांकडील मोठा दारूगोळा आणि काही साहित्य जप्त करण्यात आले. त्यावरून मारला गेलेला दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असून जैशचा सदस्य असल्याचे उघड झाले.

पाकिस्तानी दहशतवाद्याचा खातमा हे सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे. त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. याशिवाय, त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)