काश्‍मीरच्या स्वातंत्र्यासाठी लंडनमधील आंदोलनाला स्थानिकांचा विरोध

किरण रिजिजू यांनी केले देशभक्‍तांचे कौतुक

नवी दिल्ली – काश्‍मीरच्या स्वातंत्र्यासाठी लंडनमध्ये भारतीय दूतावासाबाहेर होणाऱ्या निदर्शनांना तेथील स्थानिकांनी विरोध केला आहे. काही फुटिरगटांच्यावतीने 69 व्या प्रजासत्ताक दिनी भारतीय दूतावासासमोर ही निदर्शने होणार होती. या आंदोलनाला विरोध करणाऱ्यांचे केंद्रीय गृहराज्य मंत्री किरण रिजिजू यांनी कौतुक केले आहे.

फुटिरतावाद्यांमुळे भारतीय प्रेरणेला कोणतीही बाधा येऊ शकणार नाही. अशा फुटिरतावाद्यांनी लंडनमध्ये निदर्शने करण्याचा घाट देशभक्‍त भारतीयांनी उधळून लावला आहे. अरुणाचल प्रदेशापासून जम्मू काश्‍मीरपर्यंत आणि नागालॅन्डपासून कच्छच्या रणापर्यंत आणि कन्याकुमारीपासून पंजाबपर्यंत आम्ही एक भारतवासी आहोत, या देशभक्‍त भारतीयांचे कौतुक करायला हवे, असे रिजिजू यांनी म्हटले आहे. या देशभक्‍त नागरिकांनी केलेल्या कृतीमुळे आपण प्रभावित झालो आहोत, असेही रिजिजू म्हणाले. लंडनमधीअल भारतीय उच्चायुक्‍ताने या नागरिकांबरोबर रिजिजू यांच्या वार्तालापाचा कार्यक्रमही आयोजित केला होता.

प्रजासत्ताक दिनी लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर ब्रिटीश लॉर्ड नझीर अहमद आणि हाऊस ऑफ लॉर्डसमधील पाकिस्तान धार्जिण्यांनी भारतीय दूतावासासमोर “ब्लॅक डे’ निमित्त निदर्शने आंदोलन करण्याचे ठरवले होते. काश्‍मीरला स्वातंत्र्य देण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन होणार होते. मात्र याला स्थानिक भारतीयांनी विरोध केला होता. त्यानंतर

काही फुटिरतावादी आणि स्थानिक भारतीयांमध्ये बाचाबाची झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)