काश्‍मीरच्या शोपियान जिल्ह्यातील चकमकीत चार गनिम ठार 

file photo

लष्कराचा जवानही शहीद

श्रीनगर – जम्मू काश्‍मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि हिज्बुल मुजाहिदीन संघटनेचे गनिम यांच्यात आज जोरदार चकमक झाली त्यात चार गनिमांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तथापी या चकमकीत एक जवानही शहीद झाला. अन्य दोन जवान जखमी झाले आहेत.

या गनिमांच्या अस्तित्वाची माहिती गुप्तचरांकडून मिळाल्यानंतर जवानांनी तेथे नाकाबंदी केली. त्यावेळी ही चकमक झाली. गनिमांकडूनही जवानांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. पण तरीही जवानांनी शर्थीने प्रयत्न करून या चार गनिमांना कंठस्नान घातले. यात जो जवान शहीद झाला आहे त्याचे नाव एच. सी विजय असे आहे.

ठार झालेल्या गनिमांचीही ओळख पटली आहे. या गनिमांचा सुरक्षादलाच्या जवानांवर या आधी झालेल्या अनेक घटनांमध्ये हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. चककीत एकाच वेळी चार गनिम टिपले गेल्याने सुरक्षा दलांना मिळालेले यश लक्षणीय मानले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)