काश्‍मीरच्या विशेष दर्जाशी खेळण्याचे आपत्तीजनक परिणाम होतील

मेहबुबांचा इशारा
श्रीनगर -जम्मू-काश्‍मीरच्या विशेष दर्जाशी खेळण्याचे संपूर्ण देशाच्या दृष्टीने आपत्तीजनक परिणाम होतील, असा थेट इशारा त्या राज्याच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा यांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जम्मू-काश्‍मीरच्या रहिवाशांना घटनेच्या कलम 35अ नुसार विशेष अधिकार आणि हक्क प्रदान करण्यात आले आहेत. त्या कलमाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर 6 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, मेहबुबा यांनी भूमिका मांडली आहे.

संबंधित कलम शिथिल करण्याला विरोध दर्शवण्यासाठी लढा देण्याच्या उद्देशाने पक्षाची बांधिलकी आणि विचारसरणी बाजूला ठेऊन राज्यातील लोक एकवटले आहेत. राज्याला 370 व्या कलमांतर्गत विशेष दर्जा लाभला आहे. त्याबाबत माझे दिवंगत वडील आणि माजी मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सैद यांना नेहमीच अभिमान वाटत आला. व्यापक उद्दिष्टांसाठी राज्याच्या जनतेने मोठे बलिदान दिले. त्यामुळे आपल्याला जे काही लाभले आहे; त्याची सुरक्षा आपण करणे गरजेचे आहे असे ते नेहमी म्हणायचे, असे ट्विट मेहबुबांनी केले.

दरम्यान, याचिकांच्या विरोधात विभाजनवादी, व्यावसायिक आणि नागरी संघटनांनी केलेल्या निदर्शनांमुळे मागील काही दिवस काश्‍मीर खोऱ्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. संबंधित मुद्‌द्‌यावर विभाजनवाद्यांनी काश्‍मीरमध्ये 5 आणि 6 ऑगस्टला बंद पुकारला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)