काश्मीरप्रश्नी तोडगा काढण्यासाठी पाक सरकार प्रस्ताव आणण्याच्या तयारीत

नवी दिल्ली – पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान लवकरच भारतासोबत असणाऱ्या सर्वात मोठ्या वादावर तोडगा काढण्याच्या तयारीत आहेत. काश्मीरच्या मुद्यावर उपाय काढण्याची तयारी सुरु केली असल्याचे इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने सांगितले आहे. पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांनी यासंबंधीची माहिती दिली.

शिरीन मजारी यांनी म्हंटले की, पाकिस्तानचे तहरीक-ए-इन्साफचे नवे सरकार काश्मीर मुद्यावर तोडगा काढू इच्छिते आहे. यासंबंधी एक प्रस्तावही तयार केला जात आहे. हा प्रस्ताव एका आठवड्याच्या आत पूर्ण होईल व यानंतर कॅबिनेट मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल. या प्रस्तावात काय असेल, यावर कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शपथ घेतल्यानंतर करण्यात आलेल्या पहिल्याच भाषणात दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हंटले होते. शिवाय सुषमा स्वराज पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांची भेट घेणार असल्याच्याही चर्चा आहेत. परंतु यासंबंधी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कोणतीही अधिकृतरीत्या माहिती जाहीर केलेली नाही. पुढील महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेत या दोघांची भेट होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)