काश्मीर पाकिस्तानाचाच अविभाज्य भाग; आफ्रिदीचे ‘त्या’ वक्तव्यावरून यु टर्न

नवी दिल्ली – पाकिस्तान आपलेच चार प्रांत नीट सांभाळू शकत नाही तेव्हा कश्मीर काय सांभाळणार, अशा शब्दात  माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रीदीने पाकिस्तानलाच घराचा आहेर  दिला होता. त्याचा एका व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पाकिस्तानी टीकाकारांनी त्याला लक्ष्य केले. यावर आता शाहिद आफ्रिदीने यु टर्न घेत स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय माध्यमांमध्ये दाखविण्यात येणारा माझा व्हिडीओ अर्धवट असून चुकीच्या पद्धतीने दाखविला जात आहे. याशिवाय आफ्रिदीने भारतीय माध्यमांना चांगलेच सुनावले आहे.

शाहीर आफ्रिदीने म्हंटले कि, भारतीय माध्यमांमध्ये दाखविण्यात येणारा माझा व्हिडीओ चुकीचा आहे. यामध्ये माझे सुरुवातीचे वक्तव्य दाखविण्यात आलेले नाही. काश्मीर कधीही न सुटलेला प्रश्न आहे. या प्रश्नाला संयुक्त राष्ट्रांतर्गत सोडविण्यात आले पाहिजे. त्याने पुढे म्हंटले कि, मीही पाकिस्तानी नागरिकांप्रमाणे आझाद काश्मीरचे समर्थन करतो. काश्मीर पाकिस्तानचा अविभाज्य भाग आहे.

काय म्हंटले होते शाहिद आफ्रिदीने –
पाकिस्तानला आपलेच चार प्रांत सांभाळता येत नाहीत, त्यामुळे त्याने काश्‍मीरची चिंता करणे सोडून द्यावे. पाहिजे तर काश्‍मीर भारतालाही देऊ नका. ते स्वतंत्र राहू द्या. असे आफ्रिदीने म्हटले आहे. शाहिद आफ्रिदीने केलेल्या या वक्तव्यावर पाकिस्तानमध्ये वादंग माजले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)