काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीला पाकिस्तान जबाबदार : संयुक्त राष्ट्रे

न्यूयॉर्क : काश्मीर खोर्‍यात लष्करावर दगडफेक करून परिस्थिती अस्थिर करणार्‍या संघटना या पाकिस्तानशी संबंधित असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

काश्मीरमधील परिस्थितीबाबत या अहवालात नमूद केल्यानुसार येथे भारतीय लष्करावर हल्ला करण्यासाठी जैश-ए-मोहम्मद व हिजबुल मुजाहिद्दीन या दोन दहशतवादी संघटनांनी अल्पवयीन मुलांची भरती केली होती. या दोन्ही संघटना पाककडून पुरस्कृत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अल्पवयीन मुले व हिंसाचार याच्याशी संबंधित आपल्या वार्षिक अहवालामध्ये संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानचे संरक्षण असलेल्या या दहशतवादी संघटनांना दोषी मानले असून जगभरात इतरत्र अशा दुष्कृत्यांसाठी तब्बल १० हजार मुलांचा वापर झाल्याचे या अहवालात उघड करण्यात आले आहे. एकूण वीस देशांचा यात समावेश असून यामध्ये भारतासह सीरिया, अफगाणिस्तान, येमेन, फिलिपिन्स व नायजेरियाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)