काश्मीरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई

श्रीनगर : सोशल मीडियाच्या माध्यमातून व्देष पसरविणा-या ‘की पॅड जिहादीं’ विरुद्ध जम्मू-काश्मिर पोलिसांनी आता मोहिम उघडली आहे. जेणेकरुन कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवता येईल. अधिका-यांनी सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून तेढ निर्माण करणे, कोणत्याही घटनेला जातीय रंग देणे असे प्रकार सुरु आहेत.

पोलिसांनी पाच व्टिटर हँडल्सविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, फेसबूक आणि व्हॉटसअ‍ॅपवर दिशाभूल करणाºया पोस्ट टाकल्याप्रकरणी सेवा देणाºया कंपन्यांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आवश्यक कारवाई करता येईल. सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर पोलीस विशेष लक्ष ठेऊन आहेत.

एका अधिका-याने सांगितले की, २०१६ नंतर जम्मू आणि काश्मिरात काही समूहांकडून चुकीची माहिती पसरविली जात आहे. काही पक्ष आपले राजकीय उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा चुकीच्या माहितीमुळे जातीय संघर्ष होऊ शकतो. हे लढाईचे नवे मैदान आणि नवी लढाई परंपरागत शस्त्रांपेक्षा वेगळे आहे. यातील जिहादी कॉम्युटर आणि स्मार्टफोनचा उपयोग काश्मिर खोºयातून किंवा बाहेरुन करत आहेत.

अधिका-यांनी सांगितले की, आम्हाला कॉम्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम-इंडिया (सीईआरटी-आयएन) कडून फेसबूक व व्टिटरवरील काही पेजेस ब्लॉक करण्याबाबत तक्रारी आलेल्या आहेत. काही सिम कार्ड हे व्देष पसरविण्याचेच काम करण्यासाठी वापरले जातात. अशा व्हॉटसअ‍ॅपची सेवा कंपन्यामार्फत बंद करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)