काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद

जम्मू: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. अनंतनागमध्ये शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकाला लक्ष्य केलं. त्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले.

अनंतनागमधील शीरपोरामध्ये सकाळी सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात दोन जवान गंभीर जखमी झाले. रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पसार झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)