काश्मीरमध्ये जवानांना सापडली दहशतवाद्यांची ‘फोल्डिंग शिडी’

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. सुरक्षा दलाच्या जवानांना पाहताच दहशतवादी त्यांच्याकडे असणारे सामान तिथेच टाकून पळाले. यामध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीसाठी आणलेल्या एका शिडीचाही समावेश आहे. लहान टेकड्यांवर वेगाने चढण्यासाठी दहशतवादी या फोल्डिंग शिडीचा वापर करायचे.

लष्कराने या शिडीचा एक व्हिडीओ जारी केला आहे. ही शिडी पूर्ण फोल्ड केल्यावर एका बॅगेतही ठेवता येऊ शकते. बॅगेत अगदी सहज मावणारी ही शिडी 15 ते 20 फुटापर्यंतच्या चढाईसाठी वापरता येऊ शकते. वजनाला हलकी, सहज फोल्ड करता येणाऱ्या या शिडीमुळे दहशतवाद्यांना घुसखोरी करताना मोठी मदत मिळते.

गुरुवारी दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न केला जात असताना सुरक्षा दलांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. जवानांनी गोळीबार सुरू केल्यानं दहशतवादी हातातील सामान तिथेच टाकून पळून गेले. यामध्ये जवानांना दहशतवादी वापरत असलेले शिडी सापडली. छोटे नाले, भित ओलांडण्यासाठी, टेकड्यांवर वेगानं चढण्यासाठी दहशतवाद्यांकडून या शिडीचा वापर करतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)