काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारला कोणताही धोका नाही- राम माधव

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नसून हे सरकार उत्तम प्रकारे काम करत असल्याचे भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी स्पष्ट केले. या दोन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयामध्ये झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हे विधान केले आहे.

जम्मू काश्मीरचे प्रभारी असणारे राम माधव या बैठकीनंतर,” मी पक्षाच्या आमदारांच्या व ज्या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे, त्यांच्याशीही बोलणार आहे. चर्चेनंतर राज्यात होत असलेल्या राजकीय घटनांबाबत निर्णय घेतला जाईल.” असे म्हणाले.

दरम्यान, कठुआ बलात्कार प्रकरणानंतर सरकारने कोणत्या प्रकारे पावले उचलली पाहिजेत यावर चर्चा करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या पक्षाच्या आमदारांची भेट घेण्यासाठी श्रीनगरमध्ये आहेत. या खटल्याचा निकाल फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी मेहबुबा मुफ्ती जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाकडे विनंती करणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा या गुन्ह्यात समावेश आहे त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)