काशिळ बसस्थानक असून अडचण…नसून खोळंबा

विद्यार्थी, ग्रामस्थ आणि प्रवासी रास्ता रोको आंदोलनाच्या तयारीत

काशीळ – काशिळ (ता. सातारा) येथील बसस्थानकामधून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे हे बसस्थानक असून अडचण व नसून खोळंबा अशा परिस्थितीत आहे. या बसस्थानकामध्ये पूर्वी दोन वाहतूक नियंत्रक कार्यरत होते. मात्र सध्या एक वाहतूक नियंत्रक कमी केल्यामुळे बसस्थानक आणि परिसर बेवारसांचे माहेरघर होऊ लागले आहे. एक वाहतूक नियंत्रक कमी केल्यामुळे सायंकाळी पाच ते सकाळी नऊ या वेळेत बसस्थानकात आवो जावो घर तुम्हारा’ अशी स्थिती निर्माण होते.

ज्या एसटी बसेसना याठिकाणी येऊन प्रवाशांची चढ-उतार करणे बंधनकारक आहे. त्यादेखील एसटी बसेस सायंकाळी 5 नंतर सकाळी 9 पर्यंत बसस्थानकांमध्ये येत नसल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून सबंधीत अधिकारी वारंवार विनंती करून देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काशिळ बस स्थानक हे राष्ट्रीय महामार्गावरील ग्रामीण भागात आकाराने सर्वात मोठे असलेले बसस्थानक आहे. पाल, तारळे, मुरूड परिसरातील शेकडो गावातील प्रवाशी, भाविक तसेच विद्यार्थ्याची मोठ्या प्रमाणात या बसस्थानकामधून इतरत्र ये-जा करत असतात. या बसस्थानकामधून चारशे पाचशे विद्यार्थ्यांना सवलत पास दिले जात असल्याने लाखो रुपयांची उलाढाल होत असते. हे बसस्थानक सुरू झाल्यापासून दोन वाहतूक नियंत्रक कार्यरत होते. दरम्यान बसस्थानकामध्ये निवासी वाहतूक नियंत्रक कार्यरत असल्यामुळे रात्री उशीरा येणाऱ्या तसेच सकाळी लवकर जाणाऱ्या प्रवाशी आणि विद्यार्थ्याची गैरसोय होत आहे.

काशिळ बसस्थानकात लाखो रुपयांचा खर्च करून संरक्षक भिंत तसेच शौचालय, इमारत डागडूजी करण्यात आली आहे. मात्र, निवासी वाहतूक नियंत्रक कमी केल्यामुळे हे बसस्थानक रात्रीच्या वेळी बेवारस झाल्याने नव्याने बसस्थानकाची केलेली रंगरंगोटी, बसवलेले सीसीटीव्ही, मोठं मोठे हॅलोजन नक्की कुणाच्या फायद्याचे? असा सवाल सध्या उपस्थित होत असून, सडक सख्याहरीचा उपद्रव सुरू झाला आहे. यावर वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात अनेक गैरप्रकार सुरू होण्याची भितीही निर्माण झाली आहे. यामुळे एसटी महामंडळाने पुर्वीप्रमाणेच निवासी वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती करणे आवश्‍यक आहे.

लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या काशीळ बस स्थानकाकडे संबंधीत अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशी तसेच विद्यार्थ्याची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीच्यावतीने अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने येत्या आठ दिवसात पुर्वीप्रमाणे दोन निवासी वाहतूक नियंत्रक कार्यरत करावे तसेच महामार्गावरून ये जा करणाऱ्या ज्या एसटी बसेसना थांबे आहेत अशा सर्व बसेस बसस्थानकात याव्यात आणि गेल्या अनेक वर्षांपासून बसस्थानकातील रखडलेले डांबरीकरण त्वरित करून घ्यावे, अन्यथा ग्रामपंचायत, नागरिक विद्यार्थी आणि प्रवाशी यांच्यावतीने महामार्गावर एसटी रोको’ करून तीव्र आंदोलन छेडले जाईल.

सुभाषराव जाधव,
सरपंच, ग्रामपंचायत काशिळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)