काशिंबेगच्या उपसरपंचपदी सचिन टेके

मंचर – आंबेगाव तालुक्‍यातील श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे सचिन शांताराम टेके विजयी झाले आहेत. शिवसेनेचे उमेदवार सचिन टेके यांना 8, तर राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल मानकर यांना 3 मते पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक दीपाली थोरात आणि सहाय्यक म्हणून रामदास शिंदे यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित उपसरपंच सचिन टेके यांचा सत्कार तालुका शिवसेनेचे अध्यक्ष सुनील बाणखेले यांच्या हस्ते करण्यात आला. वडगाव काशिंबेग ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व असून सात सदस्यांसह सरपंच, उपसरपंचपद शिवसेनेकडे आहे. राष्ट्रवादीचे चार सदस्य आहेत. उपसरपंचपद हे अडीच वर्षांनी खांदेपालट होणार होते. त्यानुसार उपसरपंच सोनाली वाळुंज यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंचपदासाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे एक मत फुटून ते शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाले आहे. उपसरपंच सचिन टेके यांचा सत्कार सनातन संस्थेचे प्रवक्ते दिलीप शेटे, माजी उपसरपंच शांताराम भैय्ये, तालुका शिवसेना ग्राहक पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुनील बाणखेले, शिवाजी राजगुरू, सरपंच रुक्‍मिणी खंडागळे, माजी उपसरपंच सुखदेव शेटे, बाळासाहेब पिंगळे, संतोष पिंगळे, किशोर टेके, मंचर ग्रामपंचायत सदस्य धनेश मोरडे, शंकर पिंगळे, विजया लोखंडे, सोनाली भोईर उपस्थित होते. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपसरपंच सचिन टेके यांचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)