काव्यात्मक अस्वस्थता विचार करायला लावणारी – डॉ. सबनीस

पुणे – वाचनसंस्कृती लोप पावत असताना मनातील अस्वस्थता काव्यातुन सातत्यपूर्ण मांडत राहणे ही सोपी गोष्ट नाही. परिस्थिती आणि संघर्ष हे समीकरण सोबतीला असणाऱ्या विक्रमने प्रेम, संघर्ष, विचार, व्यक्ती, तत्वज्ञान अशा सर्वच विषयांना न्याय दिला असून काव्यात्मक अस्वस्थता मांडण्याचा त्याचा प्रयत्न विचार करायला लावणारा असल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

मराठवाडा मित्रमंडळाच्या वाणिज्य शाखेतील ज्ञानदेव सभागृहात कवी विक्रम शिंदे यांच्या अस्वस्थ या काव्यासंग्रहाचे प्रकाशन सबनीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव भाऊसाहेब जाधव, साहित्यिक प्रदीप आवटे, जाणीव जागृती फौंडेशनचे अवधूत बागल आदि उपस्थित होते.

-Ads-

आवटे म्हणाले, कविता सुचण अवघड नाही, पण ती भावना प्रत्यक्ष जगणे अवघड आहे. स्तुती केलेली कविता प्रत्येकवेळी चांगली असेलच असं नाही. कवीने मात्र स्वतःच परिक्षण करुन त्या भावनेला न्याय द्यावा.

काव्य संमेलनात अंकुश आरेकर, सचिन आशा सुभाष, अवधूत बागल, कुलदीप आंबेकर, विक्रम शिंदे, नितीन जाधव यांनी प्रेम,दुःख, अगतिकता, माणूस, जात निर्मूलन, भोवताल या विषयावर आपल्या कविता सादर केल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)