काव्यरंग कार्यक्रमास श्रोत्यांची भरभरुन दाद

मंचर- मंचर येथे आयोजित काव्यरंग कार्यक्रमाला श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली. रोटरी क्‍लब ऑफ मंचर व प्रेरणा आर्ट फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विविध विषयांवरील कविता, गीते व गझलांची मैफल असणारा काव्यरंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद मंचरचे अध्यक्ष राजाराम बाणखेले, रोटरी क्‍लब ऑफ मंचरचे अध्यक्ष सचिन चिखले, रोटरीचे माजी अध्यक्ष सचिन बांगर, सचिन काजळे, भुषण खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. सुप्रसिद्ध कवी व गझलकार अनिल कांबळे, कवयित्री ज्योत्सना चांदगुडे व निरुपा बेंडे यांनी कार्यक्रमात कविता व विविध गझल सादर केल्या. कवी अनिल कांबळे यांच्या द्यायचेच आहे तर माझे जुने प्रहर दे मला या कवितेने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ज्योत्सना चांदगुडे यांनी तुमचे भाव, तुमच्या भावना शब्द माझे असतील, वधुपरिक्षा, माझ्या कुठल्या कविता या तुमच्या तर नसतील इत्यादी कविता सादर केल्या. कवयित्री निरुपा बेंडे यांनी पैल, चिरनिद्रा, माझे माहेर पंढरी, तेथे राहतो श्रीहरी या रचना सादर केल्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरिक्षक गुन्हे शाखा पुणेचे मोहन जाधव हे उपस्थित होते. रोटरीचे माजी अध्यक्ष सचिन बांगर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन सचिन काजळे व आभारप्रदर्शन भुषण खेडकर यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)