काव्यधारा, भावतरंग संग्रहाचे प्रकाशन

पिंपरी – कवयित्री श्‍यामला पंडित यांच्या काव्यधारा कवितासंग्रह व भावतरंग या चारोळी संग्रहाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस व ज्येष्ठ ग्रामीण कथाकार बबन पोतदार यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले.

पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. काव्यधारा काव्य प्रकारांनुसार तयार करण्यात आला याबाबत डॉ. सबनीस यांनी कौतुक केले. कविता जीवनानुभवाची प्रांजळ अभिव्यक्ती आहे. गाव, जन्मभूमीपासून सीमेवर लढणाऱ्या सैनिकांपर्यंत कवयित्री श्‍यामला पंडीत यांची काव्यात्मक जाणीव विकसित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

-Ads-

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव पी. ई. कुलकर्णी, कल्याण पानगे, किसन महामुनी, डॉ. सुलभा भोसले, प्रसाद दिक्षीत, विजय खुडे आदी उपस्थित होते. शर्मिला शिंदे यांनी काव्यधारेतील श्रावण, गौरीपूजन, नागपंचमी, दुरावा, शामसंग, सरस्वतीस्तवनचे सुश्राव्य गायन केले. सूत्रसंचालन प्रणाली पंडित यांनी केले. श्‍यामला पंडित यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)