कावेरी व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्यासाठीची मुदत संपली

केंद्र सरकारच्या विरोधात तामिळनाडु अवमान याचिका दाखल करणार
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने कावेरी पाणी वाटपाबाबत दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारला कावेरी व्यवस्थापन बोर्ड स्थापन करण्याचा आदेश दिला होता. त्यासाठी त्यांना निश्‍चीत कालावधीही घालून दिला होता पण हा कालावधी उलटून गेला तरी केंद्र सरकारने हे बोर्ड अद्याप स्थापन न केल्याने केंद्र सरकारच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका तामिळनाडु सरकारतर्फे दाखल केली जाणार आहे.

कावेरी पाणी वाटपाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिलेला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी सहा आठवड्याच्या आत बोर्डाची स्थापना करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली होती. त्याची मुदत काल गुरूवारी संपली पण अजून हे बोर्ड स्थापन करण्यात आलेले नाही. या स्थितीवर आज झालेल्या तामिळनाडु मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार विनीमय करण्यात आला आणि शनिवारी या विषयी केंद्र सरकारच्या विरोधात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही याचिका सोमवारी सुनावणी साठी येण्याची शक्‍यता आहे.

हे बोर्ड नेमावे या मागणीसाठी अद्रमुकच्या सदस्यांनी गेले काही दिवस संसद अधिवेशन बंद पाडले आहे पण तरीही केंद्राने त्यांच्या मागणीकडे लक्ष दिलेले नाही. कावेरी लवादाच्या अंतिम निर्णयाची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा तामिळनाडुला होती पण ती फोल ठरली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)